Posts

३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. अमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण जिल्हा ह

पदव्युत्तर अभियांत्रिकीकरिता अमरावतीने दिला आदर्श अभ्यासक्रम...

Image
देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान मिळाले आहे. हा अभ्यासक्रम दिल्ली येथे २४ जानेवारी रोजी या विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशित केला. अमरावती : देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान मिळाले आहे. हा अभ्यासक्रम दिल्ली येथे २४ जानेवारी रोजी या विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशित केला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रम अधिक अद्यावत करुन नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधन मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे